आजीच्या शिकवणीचा व्यवस्थापनात वापर
आज पेपर वाचताना, एका बातमी ने लक्ष वेधून घेतले. आजीच्या शिकवणीचा व्यवस्थापनात वापर! एका बँकेच्या प्रमुखाने त्यांच्या आजीच्या शिकवणीचा वापर व्यवस्थापनात कसा केला. आजीने त्यांना लहानपणी बहीण भावात भेदभाव करू नये असे शिकवले होते. हीच शिकवण वापरून नम्र पणाआणि सांघिक भावना हे कंपनी मध्ये महत्वाचे ठरवले.
प्रत्येक कंपनी मध्ये दर वर्षी तुमचे काम कसे झाले याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार तुमची पगार वाढ वगैरे गोष्टी ठरवल्या जातात. बऱ्याच कंपन्या मध्ये ठराविक टक्केवारी प्रमाणे तुमच्या कामाचे मोज माप केले जाते. या पद्धतीला डावलून त्यांनी नम्र पणाआणि सांघिक भावना या गोष्टींना महत्व दिले हे विशेष.
मी काही दिवसांपूर्वीच एका नेतृत्व गुणांच्या घेतलेल्या कार्यशाळेत या गोष्टींचे महत्व सांगितले होते आणि आज हि बातमी वाचून आनंद झाला कि आपल्या सारखा कोणी विचार करत आहे.
धन्यवाद,
डॉ. सचिन मोहन भिडे
फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी
http://www.ehamanagementconsultancy.com/
संदर्भ:
Comments
Post a Comment