Posts

Showing posts from March, 2023

तरुण उद्योजक

आज दोन तरुण उद्योजकांची कथा ऐकायला मिळाली.  या दोन मुलांनी कॉलेज मध्ये असतानाच व्यवसाय सुरु केला. सुरवातीला कॉलेज मधील मुलांना कामाचा अनुभव मिळावा प्रकल्प करून म्हणून कम्पन्या आणि विद्यार्थाना जोडणारा दुवा बनले. नंतर त्यांच्या असे लक्षात आले कि विद्यार्थ्यांपेक्षा काही लोकांना थोडा वेळच काम करायचे असते अशा लोकांना जर काम मिळवून दिले तर कम्पन्यांच्या पण फायद्याचे ठरेल अशी प्रणाली बनवली. मग हि सगळी कामे तपासून घ्यायचे तंत्रज्ञान बनवले. मागच्या वर्षी त्यांची कंपनी एका मोठ्या कंपनी ने घेतली आणि ते आता त्या मोठ्या कंपनीचा भाग म्हणून काम करत आहेत.  त्यांची सगळी गोष्ट ऐकताना असे वाटले कि भारतात तरुण उद्योजक वाढले तर हि एक देश सेवाच होईल. उद्योजक अनेकांना काम मिळवून देतात.  तुम्हाला काय वाटते तरुण उद्योजकाते बद्दल? मला तुमची विचारही ऐकायला आवडतील.  धन्यवाद, डॉ. सचिन मोहन भिडे फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी http://www.ehamanagementconsultancy.com/     संदर्भ: https://hub.tie.org/e/tie-pune--my-story-session-with-sahil-sharma-and-aditya-shirole

आजीच्या शिकवणीचा व्यवस्थापनात वापर

आज पेपर वाचताना, एका बातमी ने लक्ष वेधून घेतले. आजीच्या शिकवणीचा व्यवस्थापनात वापर! एका बँकेच्या प्रमुखाने त्यांच्या आजीच्या शिकवणीचा वापर व्यवस्थापनात कसा केला. आजीने त्यांना लहानपणी बहीण भावात भेदभाव करू नये असे शिकवले होते. हीच शिकवण वापरून नम्र पणाआणि सांघिक भावना हे कंपनी मध्ये महत्वाचे ठरवले.  प्रत्येक कंपनी मध्ये दर वर्षी तुमचे काम कसे झाले याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार तुमची पगार वाढ वगैरे गोष्टी ठरवल्या जातात. बऱ्याच कंपन्या मध्ये ठराविक टक्केवारी प्रमाणे तुमच्या कामाचे मोज माप केले जाते. या पद्धतीला डावलून त्यांनी नम्र पणाआणि सांघिक भावना या गोष्टींना महत्व दिले हे विशेष.  मी काही दिवसांपूर्वीच एका नेतृत्व गुणांच्या घेतलेल्या कार्यशाळेत या गोष्टींचे महत्व सांगितले होते आणि आज हि बातमी वाचून आनंद झाला कि आपल्या सारखा कोणी विचार करत आहे.  धन्यवाद, डॉ. सचिन मोहन भिडे  फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी http://www.ehamanagementconsultancy.com/    संदर्भ:  https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/grandmothers-wisdom-he...

सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडली

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद पडली हि बातमी वाचली. २००८ साला नंतर अशी मोठी बातमी वाचली अमेरिकेतील बँक बंद पडल्याची.  मी जेव्हा २००८ सालच्या सब प्राईम क्रायसिस चा अभ्यास केला होता तेव्हा असे लक्षात आले होते कि गरज नसताना कर्ज वाटली. यामुळे अर्थव्यवस्थेत एक मोठा फुगवटा निर्माण झाला. लेहमन ब्रदर्स बंद पडल्या नंतर सगळ्यात मोठा फटका बसला तो सामान्य माणसाला.  सिलिकॉन व्हॅली बँक बंद का पडली हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. भारतातील स्टार्टअप्स वर यामुळे काय परिणाम होईल हे पण बघावे लागेल.  बघू यात तर पुढे काय होते ते.  डॉ. सचिन मोहन भिडे  फाउंडर, इह मानजमेंट कन्सल्टन्सी http://www.ehamanagementconsultancy.com/   संदर्भ: https://m.economictimes.com/news/international/business/silicon-valley-bank-collapse-what-you-need-to-know/amp_articleshow/98618537.cms